पिंपरी (Pclive7.com):- सायकल चालवा, प्रदूषणाला आळा घाला असा पर्यावरणाचा संदेश देत विशालनगर, पिंपळे निलख येथील ११ सायकलस्वारांनी गोवा राईड फत्ते केली.
विशालनगर, पिंपळे निलख येथील सायकलस्वारांनी०७ ऑक्टोबर रोजी सकाळी चार वाजता पिंपळे निलख येथून निघून पहिल्या दिवशी १९७ किलोमीटर अंतर पार करून कराडच्या पुढे नेरले येथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी कोल्हापूरच्या अंबाबाई मातेचे दर्शन करून पुढील मुक्काम आजरा येथे अंतर १४० किलोमीटर अंतर पार करत केला.
तिसऱ्या आणि फायनल दिवशी म्हणजे ०९ नोव्हेंबर रोजी ११५ किलोमीटर अंतर पार करून गोवा येथील बाघा बिच येथे राईड पूर्ण केली.
या राईडमध्ये एकूण अंतर ४५२ किलोमीटर या सायकलवीरांनी पार केले. या मोहिमेमध्ये चंद्रकांत ववले, पवन कामठे, जितीन इंगवले, विनोद बोडके, संजय टिळेकर, संतोष दरेकर, सुनील अडसूळे, उमेश साठे, रामदास दरेकर, सौरभ शेटे आणि राकेश गिरमे या ११ सायकलवीरांनी सहभाग घेतला.
पृथ्वीचे रक्षण करण्याचा संदेश..
या संपूर्ण प्रवासात जागो जागी सायकल चालवा प्रदूषण टाळा. झाडे लावा, झाडे वाढवा आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण करा असा संदेश प्रसारित केला. जागोजागी लोकांनी प्रोत्साहन दिले व आम्हीही सायकल चालवून प्रदूषणाला आळा घालू असे वचन दिले.























Join Our Whatsapp Group