पिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा राज्यव्यापी संप सुरू आहे. वल्लभनगर आगारात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. त्यास महापौर उषा ढोरे यांनी भेट दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आंदोलनास पाठिंबा दिला.
एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे वेतन, भत्ते, अपुऱ्या सोयी सुविधा तसेच ड्युटीवर असताना मुक्कामाच्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधांचा अभाव व त्यामुळे होणारी गैरसोय इत्यादी विविध अडीअडचणी, समस्या मांडत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण होण्याची गरज आंदोलनकर्त्यांनी महापौर माई ढोरे यांचेकडे व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने देखील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करून कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या अडीअडचणी सोडवून मार्ग काढण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी आंदोलनस्थळी उपमहापौर हिराबाई घुले देखील उपस्थित होत्या.
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, “महाराष्ट्रातील लालपरीचे ग्रहण लवकर सुटून सर्वसामान्य प्रवाशांची वाहतुकीची होणारी अडचण लक्षात घेता राज्यामधील रस्त्यांवर लवकरात लवकर एसटी वाहतूक सुरळीत चालू होणे आवश्यक आहे.”






















Join Our Whatsapp Group