लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे मार्ग नामफलकाचे अनावरण होणार
पिंपरी (Pclive7.com):- नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबीर व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक त्रिभुवन यांनी केले.
रहाटणीतील छत्रपती चौक, लिंक रोड याठिकाणी २३ नोव्हेंबर रोजी मंगळवारी सकाळी दहा वाजता हे शिबीर होणार आहे. या शिबिरामध्ये नेत्र, शुगर, हिमोग्लोबिन याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी ‘स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब मार्ग’ या नामफलकाचे अनावरणही करण्यात येणार आहे.
यावेळी नागरिकांना आवाहन करताना नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, मागील काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त टंचाई निर्माण झाली आहे. अनेक मोठ्या रुग्णालयात अवघे तीन ते चार दिवस पुरेल एवढंच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार एक सामाजिक जबाबदारी स्वीकारून आम्ही या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
तसेच कोरोना काळात नागरिकांना अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यासाठी नेत्र, शुगर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या दोन्ही शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक त्रिभुवन यांनी केले आहे.
दरम्यान, रक्तदान शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक भेटवस्तू देण्यात येणार असल्याचेही नगरसेवक त्रिभुवन यांनी यावेळी सांगितले.























Join Our Whatsapp Group