भोसरी (Pclive7.com):- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भोसरीतील संघर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकास व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संविधान चौक येथे संविधान चौक नामफलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे विद्यमान नगरसेवक संतोष (आण्णा) लोंढे व विद्यमान नगरसेवक विकास (भाऊ) डोळस हे उपस्थित होते. यावेळी दोन्ही मान्यवरांचा सत्कार संघर्ष प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आयु-निथिलेश शत्रुघ्न डोळस व सर्व सभासदांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी देविदास डोळस, दिपक डोळस, राजशेखर डोळस, अमोल डोळस हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु- किरण (नाना) बबन डोळस यांनी केले.






















Join Our Whatsapp Group