पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी प्रभाग क्र. २१ मधील नवमहाराष्ट्र मैदान व आरक्षण क्र.१६२ येथील खेळाचे मैदानाकरिता विद्युत विषयक कामांचा भूमिपुजन समारंभ नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या विषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले कि, पिंपरी प्रभाग क्र.२१ मधील क्रिडाप्रेमीसाठी नवमहाराष्ट्र क्रिडांगण येथे अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था व्हावी यासाठी सन २०१८ पासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानुसार विद्युत विभागामार्फत ९१,१७,५९३/- रक्कमेची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
तसेच प्रभागामध्ये नव्याने विकसित होत असलेल्या आरक्षण क्र. १६२ (महात्मा ज्योतिबा फुले क्रिडा संकुल) येथे देखील अत्याधुनिक विद्युत व्यवस्था करणेकामी विद्युत विभागाशी पाठपुरावा करण्यात आला होता. या कामासाठी ४५,६५,९२४/- रक्कमेची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.
भूमिपुजन समारंभास कार्यकारी अभियंता गलबले साहेब, उपअभियंता कुंभार मॅडम, कनिष्ठ अभियंता पाडवी, सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र वाघेरे व क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. यावेळी नवमहाराष्ट्र क्रीडांगण येथे उपस्थित असलेल्या सर्व क्रिडाप्रेमी वाघेरे यांचे आभार मानले.