पिंपरी (Pclive7.com):- रुपीनगर-तळवडे परिसरासाठी शांतारामबापू भालेकर यांच्या माध्यमातून या विरंगुळा केंद्राची मागणी वारंवार होत आहे. रूपीनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच विरंगुळा केंद्राची उभारणी करण्यात येईल. असे आश्वासन आमदार महेश लांडगे यांनी दिले.

रूपीनगर येथील घारजाईमाता ज्येष्ठ संघाच्या वर्धापनदिना निमित्ताने नवीन सभासद ज्येष्ठ नागरिक व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे बोलत होते.

यावेळी माजी नगरसेवक शांतारामबापू भालेकर, स्वीकृत नगरसदस्य पांडुरंग भालेकर, ज्येष्ठ नागरिक महा संघाचे ज्येष्ठ नागरीक अरुण बागडे, सचिव गजानन ढमाले, रुपीनगर ज्येष्ठ संघाचे अध्यक्ष कॅप्टन अशोक कदम, घारजाई माता ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अरुण वाळुंजकर, माजी अध्यक्ष वसंत पतंगे, रुपीनगर शिक्षण मंडळाचे सदस्य रमेश भालेकर, भाजपच्या शितल वर्नेकर, भाजप शहर उपाध्यक्ष किरण पाटील, भाजपच्या निगडी मंडल चिटणीस शिरीष उत्तेकर, भाजप प्रभाग १२ चे अध्यक्ष सोमेश्वर मेमाणे, युवा मोर्चा उपाध्यक्ष रामदास कुटे, मनसे गटनेत्या सुजाता काटे, मनसे शहर उपाध्यक्ष विशाल मानकरी, प्रहार संघटना शहर उपाध्यक्ष संदीप जाधव, युवा नेते शरद भालेकर, मोहन शेवाळे, रामदास गवारे, शामराव भालेकर, गौतम दळवी, रोहिदास भालेकर, रविराज शेतसंधी, गणेश मगर, रामभाऊ भालेकर, दिलीप काळोखे, बाळासाहेब भालेकर, विजय भालेकर, राजारामआप्पा भालेकर, शरद नारखेडे, विलास अबुज, आदिनाथ मेमाणे, बालाजी टेकाळे, श्री.पाटोळे, नंदू चव्हाण, बाबर मामा, संभाजी जगताप, रंजीत कांबळे, साळुंखे काका, सचिन गायकवाड, अशोक कोकणे, विवेक थिगळे, ऋषिकेश थिगळे, सुखदेव म्हस्के, प्रशांत करगोटे, अरुण काटे, हभप संगीताताई भालेकर, वैशाली भालेकर, सुलोचना भोज, मंगल भालेकर, कल्पना झेंडे, बाणाशेठ भालेकर, योगशिक्षक अण्णा कातोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक शांतारामबापू भालेकर म्हणाले कि, ज्येष्ठ नागरीकांची सेवा करणे हे आपले कर्तव्यच. प्रत्येक व्यक्तीला वाटते कि आपले आई-वडील सुखी, समाधानी असावे. दैनंदिन जीवनात जगताना ज्येष्ठांच्या काहीतरी समस्या असतात. त्या समस्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. ज्येष्ठ असले तरी ते समाजासाठी तरूणच आहे.
प्रास्ताविक अरुण वाळुंजकर यांनी केले. सूत्रसंचालन दादासाहेब बोरूडे यांनी तर आभार स्वीकृत नगरसदस्य पांडुरंग भालेकर यांनी मानले.





















Join Our Whatsapp Group