पिंपरी (Pclive7.com):- रांची येथील गणपतराय स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेमध्ये ५४ किलो वजन गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी चिंचवड येथील प्रगती गायकवाड हिने कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आज (दि.१९) स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी प्रगती गायकवाड यांच्या घरी जाऊन कुस्ती स्पर्धेत यश संपादन करुन पिंपरी चिंचवडचे नावलौकिक केल्याबद्दल तिचा सत्कार केला. यावेळी नगरसेविका निर्मलाताई गायकवाड उपस्थित होत्या.

यावेळी नगरसेवक यादव म्हणाले की, प्रगती गायकवाड यांनी मुलगी असून कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणे कौतुकास्पद आहे. यामुळे देशभरात शहराचे नाव झळकले आहे. तिने सांगतलेल्या अनुभवावरून आई-वडिलांची मिळालेली साथ आणि प्रशिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावर चालल्या मुळेच ती यश संपादन करु शकली.

प्रत्येक मुलीने तिच्याकडून आदर्श घेऊन खेळामध्ये उतरून आई वडील यांची मान उंचावली पाहिजे. भारतीय जनता पार्टी ही देशभरात खेळाडूंसाठी अतिशय चांगल्या प्रकारचे काम करत आहे.
खेळाडू हे देशाचा कणा आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने खेळाडूंना प्रोत्साहनपर योजना राबवल्या जातात. आमदार महेश दादा लांडगे हे पैलवान असल्यामुळे प्रत्येक खेळावर त्यांचे विशेष लक्ष असून खेळाडूंना जास्तीत जास्त सुविधा कशा दिल्या जातील ते बघत असतात.





















Join Our Whatsapp Group