जे.डी. ट्रेकर्सच्या आठ वर्षाच्या अव्दैत शिंदेने केले कळसुबाई शिखर सर
पिंपरी (Pclive7.com):- सह्याद्री पर्वत रांगेतील राज्यातील १,६४६ मीटर उंचीचे सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई. हे शिखर सर करण्याचे कोणत्याही ट्रेकर्सचे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील स्वप्न असते. हे शिखर सर करण्यासाठी अनुभवी ट्रेकर्सची देखील चांगलीच दमछाक होते.

मात्र, महापौर माई ढोरे यांचा नातू व जे.डी. ट्रेकर्सचा सभासद अव्दैत भुषण शिंदे याने आठव्या वर्षी कळसुबाई शिखर अवघ्या ३ तास १७ मिनिटांत सर करण्याची किमया केली आहे. त्यासोबत अवधुत तानाजी भोंडवे वय १५ वर्ष याने ही कळसूबाई शिखर सर केले आहे.
वडिलांकडून बाळकडू
ट्रेकची आवड असलेला अव्दैत शिंदे याला वडील भुषण शिंदे यांच्याकडून ट्रेकिंकचे बाळकडू मिळालेले आहेत. अवघ्या आठव्या वर्षी केलेल्या या कामगिरीचे आणि खासकरुन त्यांनी दाखविलेल्या साहसाचे, जिद्दीचे सोशल मीडियावर ट्रेकर्सकडून कौतुक केले जात आहे. भविष्यात कळसुबाई शिखराहून जास्त उंचीचे ट्रेक करण्याचे त्याचे स्वप्न आहे.
जे.डी. ट्रेकर्सचे बाल सभासद त्याचप्रमाणे गणेश वाजे, महेंन्द्र कुदळे, भूषण शिंदे, केतन कुंजीर, ओंकार स्वामी, मंगेश कोंद्रे, राजेश ढोरे, पप्पुशेठ ससार, मयूर पातुरडे, रुत्विक बाळासाहेब लावरे, महापौर माई ढोरे व जे.डी. ट्रेकर्सचे मार्गदर्शक जवाहर ढोरे यांनी अव्दैत व अवधुत तसेच सर्वांनचे कौतुक करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





















Join Our Whatsapp Group