पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड गावात मंगलमूर्ती वाडा येथे श्रीमन् महासाधु श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 22 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी श्रीमन् महासाधु श्री मोरया गोसावी यांच्या संजीवनी समाधीचे दर्शन घेतले.
यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी डॉ. कैलास कदम यांचा शाल, श्रीफळ आणि श्रीमन् महासाधु श्री मोरया गोसावी यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.
यावेळी डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्याकडे देणगी म्हणून रक्कम रू. 21,000/- (एकवीस हजार रुपये) चा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तसेच येथे सुरू असलेल्या रक्तदान शिबिरास त्यांनी भेट दिली.
यावेळी रक्तदान शिबीराचे आयोजन राजू शिवतरे, तसेच संदीप शिंदे, युवक कॉंग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, कॉंग्रेस पदाधिकारी विश्वनाथ जगताप, के. हरिनारायणन, माऊली मलशेट्टी, निखिल भोईर, नयन पालांडे, कौस्तुब नवले, सौरभ शिंदे, आबा खराडे, बाबू राठोड, दिनकर भालेकर, जेवियर अँथनी आदि उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group