पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले ७ नवीन रुग्ण आज (दि.२३) सापडले आहेत. त्यामध्ये ४ पुरुष, २ महिला आणि १ लहान मुलीचा समावेश आहे. ४ रुग्ण महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयात तर ३ रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज आलेले रूग्ण हे नेदरलँड, साऊथ आफ्रिकेवरून आलेले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आजपर्यंत शहरातील १८ आणि बाहेरील १ अशा १९ रुग्णांची नोंद झाली आहे.
आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे.
आज (दि.२३) ओमीक्रोन ०७ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. ०७ पैकी ०४ पुरुष ०२ महिला व एक लहान मुलगी आहे. सदर रुग्णांपैकी ०४ रुग्ण नवीन भोसरी रुग्णालय व ०३ रुग्ण खाजगी रुग्णालयमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
आज एकूण ५३ कोविड १९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ३५ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन सदर रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाश्यांची कोविड 19 तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.
दरम्यान सर्व रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.





















Join Our Whatsapp Group