पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील माध्यमिक विद्यालय येथे १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेस भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
याविषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे. सदर वयोगटासाठी कोव्हॅक्सिन या लसीचा वापर करण्यात येणार आहे. पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालय व माध्यमिक शाळा (जुना ड प्रभाग) या ठिकाणी महापालिकेच्या वतीने ५० टक्के ऑफलाइन नोंदणी करण्याची सोय करण्यात आलेली आहे.
सदर कार्यक्रमास नगरसेवक संदीप वाघेरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली भामरे, सीनियर सिस्टर जगताप, मोनळी लोहार, शुभांगी भुजभुजे सामाजिक कार्यकर्ते कैलास ठाकुर उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group