पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ प्रभाग अतिक्रमण पथकाच्या मार्फत 19 टपऱ्या व 13 ठिकाणच्या फुटपाथवरील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आज (शनिवारी) केली.

सकाळी 11 वाजता अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली. प्रभाग क्रमांक 2 व 8 मध्ये सरकार चौक ते बो-हाडेवाडी आणि पुणे नाशिक रोड लगतच्या फुटपाथवरील सर्व टपऱ्यावर अतिक्रमण ची कारवाई करून टपऱ्या जप्त करण्यात आल्या. तसेच अनधिकृत फ्लेक्स काढण्यात आले.
क प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली व बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, निवृत्ती गुणवरे, राजश्री सातळीकर , अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून प्रशासनाने अतिक्रमण कारवाई पुन्हा सुरू केली आहे. दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे.























Join Our Whatsapp Group