पिंपरी (Pclive7.com):- अनेकजण संक्रातीमध्ये वेगवेगळे वाण लुटतात पण रहाटणी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते माजी स्विकृत नगरसेवक सागर कोकणे आणि प्रियंका कोकणे यांनी वाणमार्फत स्वच्छतेचा संदेश दिला आहे. सागर कोकणे यांनी रहाटणी, श्रीनगर परिसरात वाण म्हणुन नागरिकांच्या घरोघरी जावून डस्टबिनचे वाटप सुरु केले आहे.

महिलांच्या दृष्टीने संक्रांतीचे मुख्य आकर्षण म्हणजे हळदी-कुंकूचा कार्यक्रम हळदी-कुंकू करायचं म्हटलं की सगळ्यात आधी विचार होतो तो, यंदा संक्रांतीमध्ये काय वाण लुटायचं याचा. परंतु एक अनोखा उपक्रम रहाटणी परिसरात सागर कोकणे यांनी राबविला आहे. कचराच्या समस्येमुळे आपला परिसर प्रदुषित होत असून अनेक रोगराईना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.
सध्या नवनविन आजारांमुळे आपण त्रस्त असून त्यावर मात करण्यासाठी या नविन वर्षात आपल्या घरातील कचरा आजुबाजुला न टाकता डस्टबिनमध्ये संकलन करून महापालिकेच्या येणाऱ्या कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीमध्ये टाकावा जेणे करून आपला परिसर स्वच्छ व सुंदर राहील. असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सागर कोकणे यांनी वाणाचे वाटप केले आहे.
यावेळी माजी नगरसेवक खंडूशेठ कोकणे, माजी स्वीकृत नगरसेवक सागर कोकणे, पै. अजय कदम, मोरेश्वर गोडांबे, पै. शिवराज तांबे, विशाल नाचपल्ले, शशिकांत वहिले, महेश गोडांबे, प्रशांत सोनवणे, शुभम नढे, मयुर गोडांबे, पुष्कर राजवाडे, प्रथमेश नढे, साहिल नढे, मयुर कोईमाले, संग्राम गोडांबे, स्वप्निल कोकणे, साई गोडांबे, गणेश तुकशेट्टी, अक्षय म्हेत्रे, बाळा उघाडे, अनिकेत लोखंडे व सागर कोकणे मित्र परिवार उपस्थित होता.





















Join Our Whatsapp Group