पिंपरी (Pclive7.com):- वाकड येथील दत्त मंदिर परिसरातील रस्त्यावर अज्ञातांनी “आम्हाला नवीन चिल्ड्रन पार्क बांधून देणारा नगरसेवक हवा”, “होय मी लहान मुलगा बोलतोय” अशा आशयाचा बॅनर लावून अनोख्या पद्धतीने मागणी केली आहे. या बॅनरवर कोणत्याही संघटना अगर राजकीय व्यक्तीचा उल्लेख नाही.
याशिवाय पाणीपुरवठा, क्रीडांगण, उद्याने, प्रेक्षागृह, प्रसूतिगृह व इतर नागरी सुविधांबाबतचा उल्लेखही लावलेल्या इतर बॅनरवर दिसत आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक प्रभागातील नागरिकांना सेवा-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलेत असा सवाल उपस्थित करीत आहेत?
वाकड येथील पालिकेच्या शाळेपासून ते मानकर चौक ते डांगे चौक परिसरापर्यंत पालिकेच्या खांबावर अनधिकृतपणे हे बॅनर लावल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालिकेचा अतिक्रमण विभाग या फ्लेक्सवर कारवाई करणार? की बॅनर लावणाऱ्यांना शोधून त्यांच्याकडून दंड वसूल करणार, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित होताना दिसतोय.






















Join Our Whatsapp Group