पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख येथील कै.नारायणराव चोंधे शिक्षण संस्थेच्या विद्या विनय निकेतन विद्यालयात ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न झाले.
त्यावेळी डॉ. राजदत्त देवरे, डॉ. प्रियांका देवरे, डॉ. अंकुश अग्रवाल, डॉ. नेहा अग्रवाल, प्रभाग क्र.२६ च्या विद्यमान नगरसेविका आरतीताई चोंधे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर संकेत सुरेश चोंधे, आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर वेदपाठक, पुरुषोत्तम दोमकुंडवार उपस्थित होते. डॉ. राजदत्त देवरे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. डॉ. राजदत्त देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर आदर्श ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुधाकर वेदपाठक यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, ब्लड शुगर तपासणी, ECG, HBA1C, Lipid Cholesterol व दंत चिकित्सा तपासणी या तपासण्या करण्यात आल्या. व शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घेतला.