देहू (Pclive7.com):- गेल्या पाच वर्षांपूर्वी पक्षसंघटनेतील अनेक जण दुसरीकडे चालले होते. त्या काळात सुनील शेळके यांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहून मावळातून विजय मिळवला. आता तर त्यांनी चक्क देहूगाव नगरपंचायतीवर ताबा मिळवला. डोळ्यावर विश्वास बसत नसला तरी देहूकरांचा विश्वास पूर्ण करा. येत्या वर्षभरात या नगरीचा कायापालट करा, असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी देहू येथे केले.

देहू नगरपंचायतीच्या सदस्यांचा सत्कार समारंभ व देहूच्या विभागीय कार्यालय याचे उद्घाटन खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. सुनील शेळके, बबनराव भेगडे, प्रकाश हगवणे, देहू नगर पंचायत निवडणुकीत निवडून आलेले राष्ट्रवादीचे १४ सदस्य आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसने देहू नगरपंचायत एक हाती सत्ता मिळवली. १७ पैकी १४ नगरसेवक निवडून आणले. विशेष म्हणजे निवडून येणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. खा. सुळे यांनी प्रथम मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर कार्यालयाचे उद्घाटन झाले. इंद्रायणी नदीच्या पुलावरून इंद्रायणी परिसर त्यांनी पाहिला. नंतर कार्यक्रमस्थळी आल्या.
नगरपंचायतीत महिलावर्ग जास्त निवडून आला आहे. एक वर्ष जाऊद्या नंतर सर्व परिसराचा कायापालट करूनच दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. देहसाठी आजवर अनेक विकास कामे केली. निधीची कमतरता पडणार नाही. जी काही कामे राहिली असतील ती पूर्ण करा, असे त्यांनी सांगितले.
खा. सुळे यांच्या हस्ते नवनियुक्त सदस्यांचा सत्कार करण्यात आला. एक दिवस मी आ. सुनील शेळके यांना न सांगता येथे येईन; तसेच येथील विकासकामांची पाहणी करेन, असेही यावेळी त्या म्हणाल्या.





















Join Our Whatsapp Group