पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर व सिमाताई भालेकर यांच्या विशेष प्रयत्नातून महिलांना मोफत विमा संरक्षण देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रुपीनगर तळवडे येथे महिलांना मोफत विमा संरक्षण कवच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी धनंजय भालेकर व सिमाताई भालेकर विशेष प्रयत्न केले होते.
यावेळी रुपीनगर तळवडे परिसरातील पाच हजार महिलांना विमा संरक्षण स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक विक्रांत लांडे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, रवींद्र आप्पा सोनवणे, युवानेते शरद भालेकर, विशाल मानकरी तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group