पिंपरी (Pclive7.com):- मावळचे माजी खासदार गजानन बाबर यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. त्यामुळे नागरिक, कार्यकर्ते, समर्थकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून गजानन बाबर आजारी आहेत. दोन दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून व्हेंटिलेटरवर आहेत. कार्यकर्ते, समर्थकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन बाबर यांच्या नातेवाईकांनी केले.






















Join Our Whatsapp Group