पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या पिंपळे सौदागर येथील जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

यावेळी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ आणि श्री.पांडुरंगाची मुर्ती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते माजी नगरसेवक शंकर काटे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी प्रशांत सपकाळ, लेवा पाटील समाज पिंपळे सौदागरचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे भागवत झोपे, निर्मल गाजरे, कृष्णाजी खडसे, संदिप भोळे, तेजस वाघुळदे, सौ.गायत्री तेजस वाघुळदे आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group