पिंपरी (Pclive7.com):- रविवार दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी सप्तर्षी फाउंडेशन प्रकल्प कार्यालय रहाटणी येथे आयोजित केला होता. या शिबिराचे उदघाटन श्री.संदीप नखाते (स्वीकृत नगरसेवक), यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी रोहन भालेराव, अनुप यादव, सप्तर्षी फाउंडेशनचे संस्थापक सचिव मनोजकुमार बोरसे, सौ.रूशाली बोरसे, समीना काझी, शितल जाधव, श्रध्दा नगरे, जयश्री डांगे, उमेश देसाई, किरण जाधव, आदित्य हेंद्रे, साहील ठोंबरे तसेच पालक प्रतिनिधी व स्वयंसेवक म्हणून श्री.रविंद्र तोडकरी, श्री देवकर, श्री नायकोडी इत्यादी उपस्थित होते.
या शिबीरात दिव्यांग बांधवांची विविध कागदपत्रे काढण्यासाठी होणारी गैरसोय कमी व्हावी व त्यांना आवश्यक दाखले व कागदपत्रे तसेच दिव्यांगांसंबधीत असणाऱ्या शासकीय व इतर योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली मिळावा याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये त्यांना दिव्यांग दाखले (युडीआयडी) मिळण्यासाठी नोंदणी, निरामय आरोग्य योजना अंतर्गत क्लेम/वैद्यकीय खर्चाचे कागदपत्राची स्वीकृती, रेल्वे सवलत नोंदणी, शासकीय शिष्यवृत्ती व अर्थसहाय्य, दिव्यांग मुलांचे व कुटुंबाचे टॅक्स सवलत व भविष्य आर्थिक नियोजन मार्गदर्शन इ. सुविधा देण्यात आल्या.
या शिबिरास पिंपरी चिंचवड विभागातील जवळपास 65 दिव्यांग बांधवानी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच सप्तर्षी फाउंडेशन सोबत दिव्यांग व्यक्तींच्या पालकांनी सुद्धा स्वयंसेवक म्हणून या कार्यासाठी आपली सेवा दिली.
सदर शिबिराच्या समारोपात उपस्थित लाभार्थी दिव्यांग बांधव तसेच त्यांचे पालक व स्थानिक रहिवाशांनी सप्तर्षी फाउंडेशन यांचे आभार व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group