पुणे (Pclive7.com):- लोणीकंद ते चाकण दरम्यानच्या महापारेषणच्या विद्युत पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने आज पहाटेपासून पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश भागाची बत्ती गूल झाली. त्यामुळे पुणे शहरातील पेठांचा भाग आणि सिंहगड रस्ता भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. लोणीकंद ते चाकण दरम्यान महापारेषणाती मोठी वीज वाहिनी आहे. त्यामध्ये बिघाड झाल्याने पहाटेपासून वीज बंद आहे. पुढील काही तासात वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुण्यात हडपसर, कोंढवा, कात्रज, धायरी, स्वारगेट, बाणेर, कोथरूड शिवाजीनगर रस्ता रोड फाटा रोड आजचा भाग वडगाव शेरी चंदन नगर टिंगरे नगर येरवडा यासह सर्वच भागातील वीजपुरवठा पहाटेपासून खंडित झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील पहाटेपासून वीज गेलेले आहे.

पहाटेपासून वीज नसल्याने ऑफिसला जाणार्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. सोसायटीतील टाक्या नवीन पाने चढवणे शक्य नसल्याने अनेकांची अडचण झाली आहे. पुणे महापालिकेचा वडगाव केंद्रातील पंपींग चे काम विजेअभावी ठप्प झालेली आहे त्यामुळे सिंहगड रस्ता भाग कात्रज सकाळी भाग येथे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
तसेच पेठांमधील कमी दाबाने पाणी येते तेथे मोटारीने पाणी सोडावे लागते पण पहाटेपासून वीज नसल्याने या भागातील पाण्याची अडचण निर्माण झाली आहे अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान वीज पुरवठा खंडित झाल्याने पिंपरी चिंचवड मधील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.






















Join Our Whatsapp Group