पिंपरी (Pclive7.com):- कानातून ह्दयात जाणारा युगांतक आवाज हरपला आहे. शरीर जरी सोडून गेले असले तरी लता दीदींचा आवाज नेहमी आमच्या हृदयात राहील अशा भावुक शब्दात स्वर्गीय लता मंगेशकर यांना आदरांजली नगरसेविका आरती चोंधे यांनी अर्पण केली.
विशालनगर, पिंपळे निलख येथे भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न स्व.लतादिदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यावेळी प्रभागाच्या नगरसेविका आरती चोंधे व सुधाकर हवेले यांच्या हस्ते लतादिदींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी फिरंगोजी कामठे, उदय मोघे, पुरुषोत्तम दोमकुंडवार, भरत इंगवले, सुभाष इंगळे, जयसिंगराव डुंबरे, सुधाकर वेदपाठक, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या कार्याध्यक्षा वृषाली मरळ व परिसरातील नागरिकांनी लतादिदींच्या प्रति भावना व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
तसेच सदर कार्यक्रमास रावसाहेब बाळसराफ, सुभेदार अब्दुल हमीद, विजय भोसले, बाळासाहेब इंगवले, अरविंद पाटील, अर्जुन पटेल, कृष्णा खिरीड, उमेशकांत कुलकर्णी, कचेश्वर साळुंखे, शरद गाळणकर, अनंता लोखंडे, पवन कामठे, विक्रांत गंगावणे, रुपालीताई भोजणे सरपंच जारकर वाडी, वैजयंती कुलकर्णी, सुगंधा काळे, सुवर्णा गाडे, विजयमाला पिसे तसेच विद्या विनय निकेतन विद्यालयातील शिक्षक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका आरती चोंधे यांनी केले तर मुख्याध्यापक अनंतराव गर्जे सर यांनी सूत्रसंचालन केले.