पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस इखलास सय्यद यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘धन्वंतरी आपल्या दारी’ या माहिती पुस्तिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी झाकीर रमजान शेख, ज्ञानेश्वर ननावरे, नानासाहेब पिसाळ, रमेश भोरकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण पवार, राष्ट्रवादी महिला उपाध्यक्ष आशा शिंदे, सरचिटणीस विमल गायकवाड, संगीता पारेख, राष्ट्रवादी युवक सरचिटणीस सुनील मोरे उपस्थित होते.

सर्व सामान्य नागरिकांना ही माहिती पुस्तक अतिशय उपयुक्त असून विविध रुग्णालय, रुग्णालयातील शासनाच्या योजना, विविध शासकीय योजना यासाहित इतर महितीचा समावेश असल्याची माहिती इखलास सय्यद यांनी दिली. या माहिती पुस्तिकेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group