पिंपरी (Pclive7.com):- रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शाळेत सोशल डिस्टंसिन्ग पाळून उत्साहात पार पडला.

याप्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागवत झोपे, हास्यक्लबचे अध्यक्ष सहदेव कदम, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार सर, संदीप चाबुकस्वार सर, वसंत चाबुकस्वार सर, मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश भालेराव, युवराज प्रगणे, जितेश जगताप, बाळासाहेब शेडंगे, मयुर ओव्हाळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य अशोक भेलसेवाले, दिपक काशिनाथ मारावर, राजेंद्र गुजराथी, महेंद्र गायकवाड, यावेळी प्रमुख हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्याच्या हस्ते क्रीडामहोत्सव विजेत्याना बक्षिस वितरण करण्यात आले.
गणेश वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी महाराष्ट्राची लोकधारा, सांस्कृतिक नृत्य, कोळी नृत्य, देशभक्तीपर नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन सुनंदा साळवी मॅडम व सचिन कळसाईत सर या शिक्षकांनी केले व आभार प्रदर्शन सिल्व्हेनिया जाधव यांनी केले.






















Join Our Whatsapp Group