पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प दि.२२ फेब्रुवारीला सादर करण्यात येणार होता. मात्र, त्यामध्ये बदल करीत शुक्रवारी (दि.१८) सकाळी साडेदहाला सादर केला जाणार आहे. सत्ताधारी भाजपचा हा पाचवा अर्थसंकल्प असून, आयुक्त राजेश पाटील यांचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांनी दि.२२ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याबाबत नगरसचिव विभागास पत्र दिले होते. मात्र, अर्थसंकल्पाच्या पुस्तिकांची छपाई लवकर करून मिळत असल्याने दि.१८ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जावा, अशी विनंती लेखा विभागाने केली होती. त्यास अध्यक्ष लांडगे यांनी सहमती दिली आहे.
त्यानुसार समितीची विशेष सभा शुक्रवारी सकाळी साडेदहाला आयोजित केली आहे. सभेत आयुक्त राजेश पाटील हे समितीचे अध्यक्ष लांडगे यांना अर्थसंकल्प सादर करतील. तसेच, त्याबाबतचे सादरीकरण करतील.
मागील वर्षी सन २०२१-२२ चे एकूण अर्थसंकल्प ६ हजार ६२७ कोटी ९९ लाख रुपयांचा होता. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा किती कोटींचा अर्थसंकल्प असेल, त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, निवडणुकीपूर्वी शहरवासीयांना नवीन काय मिळणार? याची उत्सुकता लागली आहे. कोरोना महामारीमुळे महापालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यातच निवडणूक तोंडावर असल्याने अर्थसंकल्पातून नवीन घोषणा होण्याची शक्यता आहे.
























Join Our Whatsapp Group