पिंपरी (Pclive7.com):- नुकताच चिखली-मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने, पिंपरी चिंचवड मधील पहिल्या संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनचा अधिकृत अभ्यास दौरा केला. मेट्रोस्टेशनची कलाकृती ही माझी संतांची नगरी अशी होती. स्टेशन वर वारकऱ्यांच्या प्रतिकृती आणि चित्ररूपे प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. याप्रसंगी महा मेट्रो आणि शाळेच्या सहयोगाची रांगोळी आणि सर्व परिसरात व मेट्रोमध्ये लावलेली रंगीत फुग्यांची आरास शोभनीय दिसत होती.
विद्यार्थ्यांना आणि पालकांना मेट्रोची कार्यपद्धत, आधुनिक यंत्रांची रचना, मेट्रोतील सोई सुविधा, सुरक्षितता, तिकीट रचना यांची प्रात्यक्षिके देण्यात आली तसेच शिस्तबद्धता, स्वच्छता, नीटनेटकेपणा यांची माहिती देण्यात आली. यावेळी मेट्रोचे अभियंता श्री. अमोल यांनी मेट्रोमुळे येणाऱ्या काळात इंधन, वेळ याची बचत होणार असून प्रदूषण कमी करणे शक्य होणार असल्याचे सांगितले.
या अभ्यास दौऱ्यात पुणे मेट्रो आणि शाळेच्या वतीने विविध स्पर्धा, मनोरंजन, सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये जादूचे कार्यक्रमाने विद्यार्थी वर्गात कुतूहल निर्माण केले. कठपुतली कार्यक्रमाने विद्यार्थी हास्य रंगात डूबुन गेली. मावळा बोर्डाच्या खेळाने शिवरायांच्या गनिमी काव्याच्या गोष्टी जागृत झाल्या. तसेच इतर बौद्धिक व मनोबल उंचावणारे खेळ खेळण्यात आले.
विद्यार्थ्यांनी मेट्रो सफरीचा आनंद घेतला. मेट्रो सोबत फोटो घेतले. विद्यार्थ्यांनी मेट्रो व इनोव्हेटीव्ह शाळेसाठी साठी गाणे म्हणले आणि “माझी शाळा.. माझी मेट्रो.. माझ्या पुण्यनगरीत” असे जयघोष केला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गाणी म्हणली. विनोद, चुटकुले सांगितले. गप्पा मारल्या. नृत्ये केली तसेच विविध एक मिनिट स्पर्धा आयोजित केल्या, उत्कृष्ट सादरीकरणास पारितोषिके दिली. विद्यार्थ्यांना ई-बाईकची राईड करण्यात आली. ९२ वर्षाच्या उत्साही पालक आजोबांनी तबला वादन करून सर्वांना आश्चर्य केले.
विशेष वेशभूषेतील चार्ली चॅप्लिन, डोरेमान आणि छोटा भीम यांनी विद्यार्थी आणि पालकांची मने जिंकली. प्रा. महादेव वाघमारे आणि श्री. संदीप साकोरे यांनी विविध नकला व बहुरूपी कला दाखवून सर्वांचे मनोरंजन केले. विद्यार्थी पालकांच्या बरोबर जेष्ठ नागरिकांनीही गाणी व संगीत नृत्याचा आनंद घेतला.
मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी आणि पालकांनी हा अभ्यास दौरा कायम आठवणीत राहील असे आमच्याशी बोलताना सांगितले. मेट्रो स्टेशन मधील छोट्या मुलांची धमाल बघून मेट्रोतील सर्व कर्मचाऱ्यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. पालकांनी लिहिलेले मनोगत हे आमच्यासाठी नवीन काही करण्याची प्रेरणा व उर्मी देईल असे शाळेच्या संचालकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी शाळेचे संचालक व प्राचार्यां श्रीमती कमला बिष्ट,संचालक डॉ संजय सिंग, श्री. प्रशांत पाटील, श्री. देवदत्त कशाळीकर, श्री. महादेव वाघमारे, श्री. विजय साकोरे, श्री. विजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे मेट्रो च्या वतीने श्री. टी. मनोजकुमार डॅनियल (डी जी एम), श्री. अमोल आणि इतर सहकाऱ्यांनी उत्कृष्ट सहकार्य केले.
देबोश्री भोंडवे, चंद्रकला कापरी, निशा पाटील, प्रीती साबने, अदिती एकवडे, प्रेमलता केंजळे, तन्वी नाशिकर, अनुराधा डिक्कर, रोहिणी भोसले, तमाळी डे, निरुपमा काकडे, संसिया लूद्राज, सुजाता शेलार, तेजश्री शिंदे , सिद्धी सावंत, कल्यानी साजन, शोभना सिंग आणि पुष्कर कापरी आदी शिक्षिकांनी कार्यक्रम यशश्वीरित्या पार पाडण्यास मोलाचे सहकार्य केले.