पिंपरी (Pclive7.com):- मोहननगर प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेविका मिनल यादव यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या बालाजी चौकातील दीपमालेचे उद्घाटन (दि.१०) शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगरसेविका मीनल यादव, नगरसेविका वैशाली काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा कविता अल्हाट, मोहननगर चे शिवसेना विभाग प्रमुख विशाल यादव, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहननगर येथील बालाजी चौकात नगरसेविका मीनल यादव आणि वैशाली काळभोर यांच्या प्रयत्नातून दीपमाळा स्तंभ उभारण्यात आला. या दीपमाळेचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
Tags: खासदार डॉ. अमोल कोल्हेदीपमाळानगरसेविकापिंपरी चिंचवडबालाजी चौकमीनल यादवमोहननगरविशाल यादववैशाली काळभोर






















Join Our Whatsapp Group