पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ रविवारी दि.१३ रोजी संपुष्ठात येत आहे. मात्र शनिवार आणि रविवारी महापालिकेला सुट्टी असल्यामुळे सर्वांनी आजच (दि.११) पालिका भवनात फोटोसेशन करत ‘सेंडऑफ’ सेलिब्रेशन केल आहे.

यावेळी महापौर माई ढोरे, महापालिका आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर नानी घुले, स्थायी सभापती नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, तसेच नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ १३ मार्चला संपत आहे. पण महापालिकेच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस त्यामुळे सत्ताधारी भाजप आणि काही इतर पक्षांच्या नगरसेवकांनी महापालिका भवनासमोर हे फोटोसेशन केले आहे. अनेकांना या सभागृहात नगरसेवक म्हणून पुन्हा येणार की नाही याची धास्ती आहे. तर अनेकांना प्रभाग कसे पडतात याची चिंता सतावत आहे. निवडणुका कधी होणार याचीही खात्री नसल्याच्या वातावरणात नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे.
येत्या सोमवारपासून म्हणजेच १४ मार्चपासून आयुक्त राजेश पाटील प्रशासक म्हणून महापालिकेचे कामकाज पाहणार आहेत. या कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभल्याचं मत व्यक्त करत महापौरांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
Tags: कार्यकाळ संपुष्ठातनगरसेवकांचे फोटोसेशनपिंपरी चिंचवड भाजपापिंपरी चिंचवड महापालिकाफोटोसेशनसेंडऑफसेलिब्रेशन






















Join Our Whatsapp Group