
लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियममध्ये २५ मार्च, शुक्रवारी दुपारी ४ वाजता हा सोहळा होणार आहे. स्टेडियममध्ये ५० हजार जण बसू शकतील एवढी क्षमता असून, याशिवाय सुमारे २०० व्हीव्हीआयपींसाठी स्टेडियममध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशिवाय भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांसह इतर प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एकहाती भाजपा…
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मागील काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि सपानं भाजपाविरोधात रान उठवलं होतं. मात्र, त्याचा परिणाम मतदारांवर झाला नसल्याचं निकालांवरून स्पष्ट झालं आहे.
एकूण जागा – ४०३
भाजपा – २५५
सपा – १११
बसपा – १
काँग्रेस – २
राष्ट्रीय लोकदल – ८
इतर – २६



















Join Our Whatsapp Group