पिंपरी (Pclive7.com):- मी पुराव्यानिशी सादर केलेल्या सर्व प्रकरणावर कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याच किरीट सोमय्या यांनी म्हंटल आहे. हसन मुश्रीफ असो, किंवा त्यांचा मुलगा, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर त्यांचा मुलगा असेल किंवा मुंबई उपआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीचे शेअर्स खरेदी प्रकरण.. या सर्व प्रकरणात कारवाई झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे वसुली सीइओ असल्याचा आरोप करतानाच त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर ही भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. गृहमंत्री नाराजी प्रकरण हे केवळ विषय वळवण्यासाठी असून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना इतर विषयावर बोलता येत नाही म्हणून हे दिशाभूल करण्यासाठी गृहमंत्री वादासारखी प्रकारणे बाहेर काढत असल्याचे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे सरकारची उलटी गिणती सुरू झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. पिंपरी चिंचवडच्या प्राधिकरण मधील कंपनी नोंदणी कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते बोलत होते.
यावेळी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, अमोल थोरात, अमित गोरखे, नामदेव ढाके, राजू दुर्गे, उत्तम केंदळे, कुंदन गायकवाड, संकेत चोंधे, शिवराज लांडगे, संदीप नखाते, दत्ता गव्हाणे आदी उपस्थित होते.























Join Our Whatsapp Group