पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात वेगवेगळ्या घटनेत दोघांचा निर्घृण खून झाल्याचे समोर आले आहे. रावेत आणि चिंचवड परिसरात आज सकाळी या दोन्ही घटना उघडकीस आल्या आहेत. ऋषीपाल यादव (५०, रा. रावेत) आणि सोमनाथ कलापुरे (रा. पिंपरी) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीपाल यादव हे सुरक्षारक्षक आहेत. दरम्यान, शुक्रवारी रात्री किवळे येथे अज्ञात इसमांनी दगडाने ठेचून त्यांचा खून केला. रावेत पोलिस तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत सोमनाथ कलापुरे आणि संशयित आरोपी दीपक यादव यांचा नेहरूनगर, पिंपरी येथे किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून यादव याने कलापुरे यांचा चाकूने भोसकून खून केला. या घटनेचा तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.























Join Our Whatsapp Group