पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत आहे. मात्र त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा आणि ते जनसेवेसाठी पुन्हा एकदा सज्ज व्हावे यासाठी माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या वतीने रहाटणीतील आनंद बुद्ध विहारामध्ये सामुदायिक बुद्ध वंदना, सुत्त पठण, रतन सुत्त, नेत्ता भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी संघाचे अध्यक्ष महादेव कांबळे, सचिव पोपट कदम, सखाराम कांबळे यांच्यासह रहाटणी परिसरातील असंख्य बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, मागील काही दिवसांपासून आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असून त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. आमदार जगताप यांचे आपल्या विहारावर विशेष प्रेम आहे. म्हणूनच मागील दहा वर्षांपासून बाबासाहेबांची जयंती असो, बुद्ध पौर्णिमा असो किंवा विहारातील कोणताही लहान मोठा समारंभ असो ते स्वतः जातीने हजर रहात असत.
आमच्यासारख्या हजारो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे आमचे भाऊ हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक योद्धा असून त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज मिळावा व ते पुन्हा एकदा जनसेवेसाठी सज्ज व्हावेत, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
Tags: आनंद बुद्ध विहारआमदार लक्ष्मण जगतापबाबासाहेब त्रिभुवनबुद्धवंदनामाजी नगरसेवकरहाटणीसुत्तपठणस्वास्थ























Join Our Whatsapp Group