पिंपरी (Pclive7.com):- दोन नातवांना घेऊन जात असलेल्या आजोबांच्या दुचाकीला हायवा गाडीने धडक दिली. यात एका नातवाचा मृत्यू झाला तर दुसरा नातू गंभीर जखमी झाला. पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर, पिंपरी येथे रविवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.

इजान, असे मृत्यू झालेल्या नातवाचे नाव आहे. तर सैफ हा गंभीर जखमी झाला. इकबाल अब्दुल कादर शेख (वय ५५, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हायवा गाडीचालक इंद्रजीत कुमार साकेत (वय २६, रा. विनोदेवस्ती, भूमकर चौक, हिंजवडी, मूळ रा. पामारीया, ता. सिंहावल सिंधी, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दोन नातवांना घेऊन मोठी मुलगी आसमा हिच्याकडे फुगेवाडी येथे दुचाकीवरून जात होते. ते जुना पुणे-मुंबई महामार्गावरून जात असताना वल्लभनगर येथील पेट्रोल पंपाजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला आरोपीने त्याच्या हायवा गाडीने पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे दोन्ही नातू खाली पडले. त्यात इजान याचा मृत्यू झाला. तर सैफ हा गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तपास करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group