पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे निलख येथील १३ वर्षीय साई कवडे याने एव्हरेस्ट बेस कॅंप वर भारताचा राष्ट्रध्वज व महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असलेला भगवा फडकविला आहे.
भारत देश आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष साजरे करत असताना पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख या भागात राहत असलेल्या बालगिर्यारोहक साई कवडे वय १३ वर्ष अवघे, याने जगातील सर्वोच्च अश्या एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅंप (५३६४ मिटर) वर दी.२७ मे या दिवशी जाऊन राष्ट्रगीत गाऊन १७५ फुटी तिरंगा ध्वज फडकवला आहे.
वसुंधरा मोहिमे अंतर्गत तुषार पवार व विनोद सुराडकर यांच्याकडून मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. साई याने आधीही बालवयातच देश विदेशांतील अनेक शिखरे यशस्वीपणे पादाक्रांत केलेली आहेत. त्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड सारख्या अनेक पुस्तकांत त्याच्या पराक्रमाची नोंद देखील झालेली आहे.