पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मनसे शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चिखले यांच्या नेतृत्वात शहरातील प्रत्येक प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण, रूग्णांना फळे वाटप, रक्तदान शिबीर, श्रीराम मंदिरात व श्री हनुमान मंदिरात महाआरती, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मनसेचे उपशहराध्यक्ष राजू सावळे यांच्या हस्ते जुनी सांगवी येथे मुळा व पवना नदी पात्र जवळ देशी वृक्ष वड, पिंपळ, चिंच, वृक्षारोपण करण्यात आले. सांगवी प्रभाग क्रमांक ४६ च्या वतीने नियोजन करण्यात आले होते.
जनहित व विधी कक्ष विभागाचे अध्यक्ष राजू भालेराव यांच्यावतीने वायसीएम रूग्णालय येथील लहान मुलं व वृद्ध यांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी जनहित व विधी कक्ष संपूर्ण टीम उपस्थित होती. काळेवाडी भागामध्ये पाचपीर चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास पन्नास जणांनी रक्तदान केले. अनिता पांचाळ व आकाश पांचाळ व मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
प्रभाग क्रमांक १३ सदगुरू दत्त उद्यानामध्ये महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा तसेच संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले-मराठे यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच रुपीनगर येथील हनुमान मंदिरामध्ये महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. याकार्यक्रमाचे नियोजन विशाल मानकरी व सुजाता अरुण काटे व संगिता देशमुख यांनी केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने चिंचवड गावातील श्री राम मंदिर या ठिकाणी महाआरती करण्यात आली. याचे आयोजन हेमंत डांगे व विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आले होते. पिंपरी मोरवाडी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याचे नियोजन काशिनाथ खजूरकर- स्वामी यांनी केले होते.
विद्यार्थी सेनेच्या वतीने वायसीएम हॉस्पिटलमध्ये वृद्धांना व लहान मुलांना, रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. याचं नियोजन सुमित कोल्हापुरे व स्वामी यांनी केलं होते. किवळे-रावेत या प्रभागात व्यापारी वर्गाकरिता रक्तदान तपासणी शिबीराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नियोजन सचिन शिंगाडे व विनोद भंडारी यांनी केले होते. विद्यार्थी सेना सचिव अक्षय नाळे यांनी चिंचवडे नगर येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी या रक्तदान करणार्या रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देखील देण्यात आली. विद्यार्थी सेनेचे उपविभाग अध्यक्ष प्रविण माळी यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला.
शहरातील पदाधिकारी उपशहर अध्यक्ष, राजू सावळे, बाळा दानवले, विशाल मानकरी, विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे, सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, सचिव अनिकेत प्रभू, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी बांगर, अनिता पांचाळ, सचिव सीमा बेलापूरकर, जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष राजू भालेराव, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष सुशांत साळवी, राजेश अवसरे, नाथा शिंदे, सचिन पगार, सुरज जाधव, देवेंद्र निकम, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, प्रभूनेताई शेख, संघटक विनोद भंडारी, परमेश्वर चिल्लरगे, अक्षय नाळे, सोमनाथ स्वामी, महेश बडगुजर, शहर संघटक पुनीत गळीतकर, नारायण पठारे, शैलेश तलाठी, सागर सोनटक्के या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली व कार्यक्रमाचे नियोजन केले.