पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन कोयते आणि एक तलवार जप्त करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.१७) गावजत्रा मैदान भोसरी आणि किवळे येथे या कारवाई करण्यात आली.

ओंकार बाळासाहेब भोगाडे (२४, रा. आळंदी रोड, भोसरी) याला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई स्वामी विठ्ठल नरवडे यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सोबत शस्त्र बाळगत असून तो गावजत्रा मैदान भोसरी येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून ओंकार याला अटक केली. त्याच्याकडून २०० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे. ओंकार भोगाडे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला होता. तपास भोसरी पोलिस करीत आहेत.
तर दुसऱ्या कारवाईत खंडणी विरोधी पथकाने किवळे येथील मराठी शाळेसमोर शंतनू उर्फ पप्पू सुनील म्हसुडगे (२२, रा. किवळे) याला अटक केली. त्याच्याकडून एक कोयता आणि एक तलवार जप्त करण्यात आली आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group