पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आजाराने त्रस्त असतानाही देखील उद्या सोमवारी (दि.२०) विधानपरिषदेच्या मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत देखील सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला होता. उद्या सोमवारी सकाळी ७ वाजता आमदार लक्ष्मण जगताप त्यांच्या निवासस्थानातून मुंबईला रवाना होणार आहेत.

चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले लक्ष्मणभाऊ तुम्ही फार मोठी कामगिरी बजावलीये राज्यसभेला, आता उद्या नाही आलात तरी चालेल, प्रकृती महत्वाची आहे, तुम्ही विश्रांती घ्या. यावर लक्ष्मण जगताप यांनी पक्षाला माझी गरज असून, मी प्रवास करु शकतो असं सांगितलं. तसंच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
सोमवारी अर्थात २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी उद्याच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधानपरिषद निवडणुकीत १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा चुरशीचा सामना रंगणार आहे.
विधानपरिषदेत भाजपने पाच तर महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. पण, अतिरिक्त उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी दोन्ही पक्षांकडे पूरेसं संख्याबळ नाही.























Join Our Whatsapp Group