पिंपरी (Pclive7.com):- रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युतविषयक कामासाठी गुरुवारी (दि. २३) पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. उद्या शुक्रवारी (दि.२४) सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

रावेत अशुद्ध जलउपसा केंद्र तसेच, निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती काम केले जाणार आहे. त्यासाठी गुरुवारी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group