पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटर व्दारे स्वत: अजितदादांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.

राज्यात कोरोनाने पुन्हा आपलं डोकं वर काढलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. पवार यांनी स्वत:हून ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
ट्विटरवर अजितदादांनी म्हटले आहे की, काल मी कोरोनाची चाचणी केली, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असं त्यांनी म्हटलं आहे.






















Join Our Whatsapp Group