लोणावळा (Pclive7.com):- लोणावळा शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात यावर्षीच्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासात शहरात तब्बल २२० मिमी (८.६६ इंच) पाऊस नोंदविण्यात आला आहे.

मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने लोणावळाकरांना अक्षरशः झोडपून काढले आहे. काल रात्री शहरात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोणावळ्यात सुरु असलेल्या जोरदार पावसाने ग्रामीण भागात इंद्रायणी नदीला पुरस्थिती प्राप्त झाली आहे.
लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यंत १५२२ मिमी (५९.९२ इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी आजपर्यंत ११७६ मिमी (४६.३० इंच) पाऊस झाला होता. मागील वर्षीची सरासरी गाठत शहरात यंदा १३ इंच अधिकचा पाऊस झाला आहे. कुलाबा वेधशाळेने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज पासून पुढील तीन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन आपत्कालीन यंत्रणांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group