पिंपरी (Pclive7.com):- प्रियसीला फिरवण्यासाठी कार व टुव्हिलर चोरणाऱ्याला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून दोन कार व १३ टुव्हिलर असा ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यश किरण सोळसे (वय २०, रा. तळेगाव एमआयडीसी रोड, तळेगाव-दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे.

या आरोपीकडून निगडी पोलिस ठाण्यातील तीन, सांगवी ठाण्यातील चार, तळेगाव-दाभाडे, पिंपरी व देहूरोड ठाण्यातील प्रत्येकी एक असे १४ गुन्हे उघड झाले आहेत. निगडी पोलिस ट्रान्सपोर्टनगर परिसरात गस्त घालत असताना एक कार संशयितरीत्या फिरताना दिसली. कार चालक सोळसे याला पोलिसांनी हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर कसून चौकशी केली असता तो चालवत असलेली कार निगडी प्राधिकरणातून सात दिवसांपूर्वी चोरल्याचे समोर आले. प्रेयसीला नवीन कारमधून फिरविण्यासाठी चोऱ्या करीत असल्याची कबुली त्याने दिली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-१ मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, सहा. पोलीस निरीक्षक निगडी पोलीस ठाणे अमोल कोरडे यांचेकडील तपास पथकातील पोलीस हवालदार सुधाकर अवताडे, सतिश ढोले, दत्तात्रय शिंदे, विलास केकाण, पोलीस नाईक शंकर बांगर, विनोद व्होनमाने, सोमनाथ दिवटे, विजय बोडके, भुपेंद्र चौधरी, राहुल गायकवाड, तुषार गैंगजे, राहुल मिसाळ यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी केली आहे.





















Join Our Whatsapp Group