आकुर्डीत दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित रक्तदान स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- रक्तदान स्पर्धा हा एक अभिनव उपक्रम असून शहरात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा पार पडत असून, राष्ट्रवादी चषक नेहमीच तरुणांना प्रेरणा देत राहील. तरुणांना प्रोत्साहित करण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे आणि या प्रेरणेने रक्तदाते उत्स्फूर्तपणे पुढे येतील असे उदगार राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी काढले.

दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित मोरया रक्तपेढ़ीच्या विशेष सहकार्याने ‘रक्तदान स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या भेटी दरम्यान अजित गव्हाणे यांनी आपले विचार व्यक्त केले.

या उपक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, प्रसाद शेट्टी, धनंजय काळभोर, माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, नगरसेविका सुलभा उबाळे, उद्योजक संजय जगताप, टाटा मोटर्स यूनियनचे कार्याध्यक्ष अशोक माने, पुना-केरळ मुस्लिम समाजाचे व्ही. एम. कबीर, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अशोक मगर, निर्मलाताई माने, प्रा.संतोष पाचपुते, त्रिमूर्ती मित्र मंडळाचे अध्यक्ष रवी भाऊ गोडेकर, उद्योजक नितीन काकडे, मौलाना राशिद मिफ्ताही, मौलाना अब्दुल गफार, राष्ट्रवादी अल्पसंख्यक सेल अध्यक्ष यूसुफ कुरेशी, हाजी गुलाम रसूल, मौलाना अलीम अन्सारी सामाजिक कार्यकर्ते महेश काटे, मनोज खिलावन, श्रीकांत वांद्रे, आकुर्डी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजित शितोळे, अकबर मुल्ला, अजय लड्डा, तेलगु समाज शहराध्यक्ष सतीश सिलम, सचिन निकम, महेश हत्ते, प्रदीप धर्मे, माणिक चासकर, आदी मान्यवरांनी भेट दिली. तसेच १८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

पारितोषिक वितरण राष्ट्रवादी पिंपरी विधान सभेचे मुख्य संघटक माजी नगरसेवक नारायण बहिरवाड़े, नगरसेवक सचिन चिखले, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, प्रा. सचिन काळभोर व अण्णा कुऱ्हाडे यांच्या हस्ते पार पडला.
रक्तदान स्पर्धा निकाल
प्रथम क्रमांक २१,००० हजार रुपये रोख – नवयुग मित्र मंडळ रुपेश कॉलनी दत्तवाडी आकुर्डी,
द्वितीय क्रमांक १५,००० हजार रुपये रोख – आपुलकी मित्र मंडळ आकुर्डी,
तृतीय क्रमांक ७,००० हजार रुपये रोख – झुंझार मित्र मंड़ळ आकुर्डी,
उत्तेजनार्थ : यमुना नगर मित्र मंडळ, त्याच बरोबर प्रत्तेक रक्तदात्यास ‘ब्लू- टूथ’ मोफत देण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय ‘योगापटु’ धनश्री पाटील व
राष्ट्रीय खेळाडू महेक इनामदार व चार्टड अकाउंट परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या ऋषभ लोढा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन झाकिर रमजान शेख व राष्ट्रवादी पिंपरी विधान सभेचे कार्यध्यक्ष इखलास सय्यद यांनी केले होते. तर रमेश भोरकर, शाहरुख शेख, दत्ता बोराडे, यशवंत भालेराव, गौतम बेंद्रे, अण्णा भोसले, वसंत सोनार, गोविंद राजेशिर्के, जयसिंग पाटील, संपत शिंदे, गंगाधर चौधरी, सुभाष चौधरी, रमेश बनसोड, चंद्रकांत इंगळे, पांडुरंग शिरोडकर, शिवाजी मिसाळ, शिवाजी निंबरे, अनिल पाटील, अनंत इंगळे, बाळू तिरोडकर, शेखर जाधव, जिब्राइल शेख, सुनील मोरे, जावेद पठाण, रूपेश जोशी, सुयोग काळभोर, केदार वायाळ, उमेर शेख मुजीब शेख, सूरज मोरे, शाम तरटे, बंटी गायकवाड़ यासह गीता सुतार, आशा शिंदे, सोनाली जाधव, विमल गायकवाड़, वैशाली गायकवाड़, आरती गायकवाड़, मनीषा उत्तेकर, अलका कांबळे, आशा मराठे, जयश्री घोळवे, रतनताई जगताप, सायराबानु शिकलगार यांनी नियोजनात विशेष परिश्रम घेतले.
यावेळी झुंझार मित्र मंडळाचे दत्ता बोऱ्हाडे यांनी त्यांच्या संघाला मिळालेली पारितोषिक रक्कम वृध्दाश्रमाला देण्याचे जाहिर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले.
Tags: आकुर्डीइखलास सय्यदजावेद शेखदिवंगत नगरसेवकद्वितीय पुण्यस्मरणपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसपुण्यस्मरणभव्य रक्तदान स्पर्धा






















Join Our Whatsapp Group