मुंबई (Pclive7.com):- शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना आज पीएमएलए न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मागील काही दिवसांपासून ते ईडी कोठडीत होते. पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी केली होती.

पीएमएलए कायद्यानुसार, संजय राऊत यांना आज पुन्हा ईडी कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण न्यायालयाने संजय राऊत यांना काहीसा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना २२ ऑगस्टपासून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे २२ ऑगस्टनंतर संजय राऊत यांना जामीन मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
आजपासून संजय राऊत यांचा मुक्काम मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असणार आहे. संजय राऊत ईडी कोठडीत असताना त्यांना काही सुविधा पुरवण्यात आल्या होत्या. प्रकृतीच्या कारणास्तव राऊतांना त्याच प्रकारच्या सुविधा कारागृहात पुरवल्या जाव्यात, अशी मागणी संजय राऊत यांच्या वकिलांनी केली आहे. घरचं जेवणं, औषधं आणि हवेशीर खोली मिळावी, अशी मागणी राऊतांच्या वकिलांनी केल्याची माहिती समजत आहे.





















Join Our Whatsapp Group