पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील महिंद्रा अँथिया सोसायटीतील रहिवाशांनी महिंद्रा लाईफस्पेसेस डेव्हलपर्स लिमिटेड कडून अपुऱ्या सेवा मिळत असल्याने (एमएल डीएल) बिल्डरच्या विरोधात काळ्या फिती बांधून मूक निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये १४४३ फ्लॅट मधील सुमारे ४०० रहिवाशी सहभागी झाले होते.
हा मूक मोर्चा सांडपाणी प्रकिया प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात सदोष असल्याने अँथियाच्या रहिवाशांच्या आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित गंभीर समस्या यासारख्या विविध तक्रारीं संदर्भात रहिवाशांचा आक्रोश होता. आज काढण्यात आलेल्या मोर्चात कुटुंबांसह सर्व रहिवासी, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
महिंद्रा अँथियापासून ते महिंद्रा नेस्टॅल्जिया (नेहरूनगर रोड पिंपरी येथील आगामी प्रकल्प) या मार्गावर काढण्यात आला. महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे व्यवस्थापन सोसायटीतील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने आणि वेळकाढुपणा करत असल्याने बिल्डर विरोधात मूक मोर्चाच्या माध्यमातून ४०० पेक्षा जास्त रहिवाशांनी शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला.
● अँथिया रहिवाशांच्या एसटीपी संदर्भातील विविध समस्या आणि उपस्थित प्रश्न
अँथिया परिसरासाठी अपुरी सांडपाणी प्रक्रिया क्षमता
एसटीपी पायाभूत सुविधांची सदोष रचना आणि अंमलबजावणीमुळे अँथियाच्या रहिवाशांचे त्रस्त जीवनमान
एसटीपी अपात्र कर्मचाऱ्यांकडून देखभाल होत असल्याने वारंवार ब्रेकडाउन
अँथिया एसटीपी परिसरातील दुर्गंधी आपला स्वच्छ आणि ताजी हवेचा अभाव जाणवतो.
लेव्हल डिफरन्सची मूलभूत चूक
एसटीपी१ बॅकप्रेशरमुळे लोअर बेसमेंटवर सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होते. मलेरिया, डेंग्यूचा वारंवार प्रादुर्भाव
ओव्हरफ्लो झाल्यामुळे इमारतींच्या पायामध्ये सतत पाण्याचा प्रवाह मुरतो.
MLDL बागकामासाठी STP प्रक्रिया केलेल्या पाणी वापराच्या वचनबद्धतेपासून दूर जात आहे.
सध्या हे मैलापाणी प्रकल्प बायपास करून अवैधरित्या महापालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडले असण्याची शक्यता आहे.
रहिवाशांनी मागील ४ वर्षेपासून वारंवार तक्रार नोंदवून समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केली आहे. बिल्डरचे स्थानिक अधिकारी विविध मार्गाने व दुर्लक्ष करून समस्या, दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला.
जरी अँथियन्स सतत विविध नागरी संस्था आणि तसेच सरकारी संस्थांचा पाठपुरावा करत असले तरी, दुर्दैवाने, महिंद्रा लाइफस्पेस MLDL व्यवस्थापन काहीतरी कारणे सांगून दिरंगाई होत आहे. या असह्य विलंबामुळे सहनशीलतेच अंत होऊन रहिवाशांनी आज सर्व सन्मानाने आणि सभ्यतेने निषेध व्यक्त केला.
MLDL ने महिंद्रा अँथियासाठी IGBC (इंडिया ग्रीन बिल्डिंग कौन्सिल) गोल्ड सर्टिफिकेशन तसेच अनेक अनोख्या सुविधा आणि वैशिष्ट्यांची जाहिरात केली होती. एकीकडे अँथियन्ससाठी ही अत्यंत विरोधाभासाची परिस्थिती आहे.
अँथियाला पिंपरी महापालिकेने सी झोनमधील सर्वोत्तम हौसिंग सोसायटी म्हणून ओळखले जाते. महिला, वृद्ध, बालकांच्या आरोग्यास विशेष धोका असल्याने मुक मोर्चामध्ये त्यांचा सहभाग विशेष होता. आजच्या मूक मोर्चाच्या माध्यमातून, ॲंथिया रहिवासी प्रामाणिकपणे अपेक्षा करतात की MLDL व्यवस्थापन आणि ग्राउंड स्टाफने जागे व्हावे आणि रहिवाशांना त्यांच्या मालकीच्या स्वच्छ, निरोगी आणि शांत वातावरणात जगू देण्यासाठी सर्व दीर्घकालीन समस्या दूर करण्यासाठी निर्णायकपणे कृती करावी. महिंद्रा अँथियाचे रहिवासी अजूनही आशावादी आहेत की महिंद्रा लाइफस्पेसेस भारतातील सर्वात प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांपैकी एक म्हणजे महिंद्राच्या ब्रँड प्रतिमेनुसार विश्वास राखतील आणि येथे सकारात्मक बदल घडवून आणतील, अशी माहिती आंदोलनकर्त्या रहिवाश्यांनी दिली.