पिंपरी (प्रतिनिधी):- भाजप सरकार सत्तेत आल्यापासून प्रचंड महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गँस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, रिंगरोडचा प्रश्न प्रलंबित आहे. भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आज ‘जन हाहाकार’ आंदोलन काढण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे पहायला मिळाले.
काळेवाडी येथील पाचपीर चौकातून अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली साडेतीनच्या सुमारास सुरूवात झाली. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, जेष्ठनेते हनुमंत गावडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवा अध्यक्ष विशाल वाकडकर, तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक,नगरसेविका, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, अच्छे दिनाचे वादे करून भाजप सरकारने जनतेचे बुरे दिन केले आहेत. जीएसटी, नोटबंदी फसली आहे. देशाचा विकास दर घटला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. शेतक-यांची फसवी कर्जमाफी, शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. महिला, युवती सुरक्षित नाहीत. अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, रिं
हा मोर्चा पुढे पिंपरीतील जयहिंद चौकातून साई चौक, शगुन चौक, पिंपरी मार्केट मार्गे भाटनगर, इंदिरा गांधी पुल, गोकूळ हॉटेल मार्गे पिंपरीतील आंबेडकर चौकात पोहचणार आहे. या चौकात मोर्चाची सांगता पवार यांच्या सभेने होणार आहे.






















Join Our Whatsapp Group