पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगणावर विजयादशमीच्या दिवशी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने भव्य ७० फुटी रावण दहन व मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना संदीप वाघेरे म्हणाले कि, दोन वर्ष कोरोना कालखंडानंतर यंदाचा विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. पिंपरी येथील नवमहाराष्ट्र विद्यालय क्रीडांगणावर भव्य ७० फुटी रावणाची प्रतिकृती तयार करीत आहोत. विजयादशमीच्या दिवशी जल्लोषपूर्ण वातावरणात रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याचबरोबर नागरिकांसाठी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहेत.
या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या शुभहस्ते कार्यक्रम सायंकाळी ठीक ७ वाजता सुरू होणार आहे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार उमाताई खापरे, आमदार आण्णा बनसोडे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार,जेष्ठ नेते आझमभाई पानसरे, राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक सचिन चिखले, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने करण्यात आलेले असून कार्यक्रमाचे संयोजन उमेश खंदारे, हरीश वाघेरे, रवींद्र कदम, कुणाल सातव, प्रवीण कुदळे, नितीन गव्हाणे, संदीप गव्हाणे, राजेंद्र वाघेरे, सचिन वाघेरे, शेखर अहिरराव यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमास माजी नगरसेवक अमर मुलचंदानी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.