पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा २० हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे साडेआठ हजार कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. याबाबतचा आदेश प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी काढला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्यात गेल्यावर्षी पंचवार्षिक वेतन करार झाला आहे. २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत हा करार आहे. गेल्यावर्षी झालेल्या करार करताना पाच हजार रुपयांनी सानुग्रह अनुदानात वाढ केली होती. त्यानुसार वर्ग १ ते ४ मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि जादा २० हजार रुपये रक्कम देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. या बोनसचा महापालिकेतील साडेआठ हजार कर्मचा-यांना लाभ होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.






















Join Our Whatsapp Group