पिंपरी (Pclive7.com):- नवरात्रीनिमित्त दांडियासाठी लावलेले मंडप काढताना झालेल्या वादातून पिंपरी चिंचवड महापालिकेचे निवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल रॉय यांच्यासह कुटूंबियांवर हल्ला झाला आहे. यात रॉय यांच्यासह ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काळभोरनगर येथे नवरात्री निमित्त दांडियासाठी उभारलेले मांडव काढण्याचे काम सुरू होते. मांडव वाल्याचे पार्किंगवरून रॉय यांच्या कुटुंबातील महिला सदस्यासोबत भांडण झाले. त्यावरून बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर मंडपवाल्याने मुले बोलावून घेवून डॉ.रॉय यांच्यावर हल्ला केला. त्यात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सर्वजण पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.





















Join Our Whatsapp Group