पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात निगडी ते दापोडी या १२ किलोमीटर अंतराच्या प्रमुख महामार्गासह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत, त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शुक्रवारी महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आले.

शहराध्यक्ष सचिन चिखले, महापालिका सेनेचे अध्यक्ष रूपेश पटेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राजू सावळे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर, विशाल मानकरी, दत्ता देवतरासे, सुशांत साळवी, श्रद्धा देशमुख, अनिता पांचाळ, नितीन चव्हाण आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी गलथान प्रशासकीय कारभाराच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मनसेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांना या वेळी निवेदन देण्यात आले. पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. सणासुदीमुळे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याने रस्त्यांवर मोठी वर्दळ आहे. एखादी वाईट घटना घडण्यापूर्वीच सर्व रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Tags: आंदोलनपिंपरी चिंचवड मनसेपिंपरी चिंचवड महापालिकामनसेमहापालिकेत आंदोलनरस्त्यावरील खड्डेसचिन चिखले






















Join Our Whatsapp Group