पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीगाव येथील ज्येष्ठ नागरिक संस्थेचा २३ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी १० वी, १२ वी मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या नातवंडांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा यथोचित सत्कार करण्यात आला. क्रिडा स्पर्धेतील विजेत्या महिला व पुरुष यांना माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने गौरव (स्मृतिचिन्ह) चिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी महिलांनी भजनी मंडळात भजने सादर केली व काही गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.दुंडय्या स्वामी होते.
सामाजिक कार्यकर्ते श्री. उदय वासरे हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लाभले. या प्रसंगी नगरसेवक श्री. संदीप वाघेरे, नगरसेविका श्रीमती- निकिता कदम, माजी महापौर श्री. संजोग वाघेरे, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष श्री अरुण बाग कार्याध्यक्ष श्रीमती – वृषाली मरळ, श्री. बाळकृष्ण माडगुळकर, श्री. शांताराम सातव, श्री. गजानन ढमाले, श्री. ईश्वर चौधरी है विभागीय उपाध्यक्ष तसेच सल्लागार श्री पंडीत खरात उपस्थित होते. पिंपरी संघाचे अध्यक्ष श्री. दत्तोबा नाणेकर उपास्थित होते. संस्थेचे सचिव श्री. अशोक कुदळे यांनी अहवाल वाचन केले. कार्याध्यक्ष श्री. सुधाकर यादव यांनी प्रास्ताविक व संरखेची माहिती दिली. कोपाध्यक्ष श्री. वसंत तावरे यांनी वार्षिक जमाखर्चाचे वाचन केले. उपस्थित सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते संस्थेच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याविषयी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
मा. सुब्रतो मुजुमदार, श्री उदय वाघेरे यांचे सदर कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले, सौ. कान्पना देशमुख, श्री. भूपाल किविल (उपाध्यक्ष) यांनी मार्गदर्शन केले. मा. श्री. कैलास भुजबळ यानी उपस्थितांचे आभार मानले व पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्वांना प्रिती भोजन देण्यात आले. यावेळी २०० सभासद या कार्यक्रमास उपस्थित होते.